रेल्वेचे चार डबे अंगावरून जाऊनही महिला सुखरूप पहा व्हिडीओ
औरंगाबाद / प्रतिनिधी - चिकलठाणा औरंगाबाद दरम्यान मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ सकाळी 09:15 वाजे दरम्यान जालना दादर जनशताब्दी जिचा वेग ताशी 100 आहे या रेल्वे चे चार डबे अंगावरून गेले तरी एक महिला सुखरूप असल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
या रेल्वेच्या प्रेशर हॉर्न मुळे घाबरून ही महिला रेल्वे रुळावर झोपली परंतु ती सरळ झोपल्यामुळे व चालकाच्या लगेच लक्षात आल्याने त्यांनी सतर्कता बाळगून रेल्वे लगेच थांबवली त्यामुळे महिलेचे प्राण वाचले यासाठी जनशताब्दी एक्सप्रेस चे मुख्य चालक अमितसिंग सहचालक धीरज थोरात त्यांचे कौतुक केले जात आहे. एवढेच नाही तर त्यांनी प्रसंगावधान राखून अवघ्या पाचशे मीटर वरच रेल्वे थांबवली व महिलेचे प्राण वाचले त्यामुळे त्यांचा सत्कारही केला जाणार आहे.