केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या औरंगाबादला
औरंगाबाद / प्रतिनिधी - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे दि.13, जुलै, 2022 रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
बुधवार, दि.13 जुलै, 2022 रोजी दुपारी 01.00 वा. दिल्ली विमानतळ येथून विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण. 03.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 03.10 वा. औरंगाबाद विमानतळ येथून मोटारीने देवगिरी व्हॅली, मिटमिटाकडे प्रयाण. 03.30 वा. देवगिरी व्हॅली, मिटमिटा येथे आगमन व स्वामी मच्छिंद्रनाथ मंदीर येथे भेट व राखीव. (स्थळ : औरंगाबाद-नाशिक हायवे, वेरुळ रोड, देवगिरी व्हॅली, मिटमिटा औरंगाबाद). 04.30 वा. देवगिरी व्हॅली मिटमिटा येथून मोटारीने हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबादकडे प्रयाण. 04.45 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आगमन व मराठवाडा विभागातील राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आढावा बैठक. (स्थळ : हॉटेल रामा इंटरनॅशनल, चिकलठाणा, जालना रोड, औरंगाबाद) सायंकाळी 05.30 वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथून औरंगाबाद विमातनळकडे प्रयाण. 05.45 वा. औरंगाबाद विमानतळ येथे आगमन. 06.00 वा. औरंगाबाद विमानतळ येथून विशेष विमानाने नागपूरकडे प्रयाण.