तरुणीला भरदिवसा बेदम मारहाण

तरुणीला भरदिवसा बेदम मारहाण

संभाजीनगर/ प्रतिनिधी - . छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तीन महिलांनी एका तरुणीला भर दुपारी बेदम मारहाण केली आहे
आरोपी महिलांनी पीडितेला जमीनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सुदर्शननगरच्या हडको येथील उद्यानात भावासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून तीन महिलांनी एका तरुणीला उद्यानातच बेदम मारहाण केली. यावेळी उद्यानामध्ये लहान मुले खेळत असताना अश्लील शिवीगाळ, आरडाओरड करून हा धिंगाणा सुरू होता. एन-11 मधील सार्वजनिक उद्यानात दुपारी ही घटना घडली.
पीडित तरुणी एन-11 च्या सुदर्शननगरमधील एका उद्यानात बसली होती. यावेळी तीन महिलांनी तिचा पाठलाग करत तिला उद्यानात गाठले.आणि अचानक तिच्यावर हल्ला चढवून लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तरुणी मारहाण न करण्यासाठी विनवणी करत होती. मात्र तीनही संतप्त महिलांनी तिला जमिनीवर पाडून मारहाण केली.
संशयातून मारहाण
तुझ्यामुळे माझा भाऊ कामावर जात नाही. तुझ्या नादाने तो बिघडला. तुझ्यासाठी तो आम्हाला त्रास देतो, अशी तक्रार करत या महिला पिडीतेला मारहाण करताना दिसत आहेत. या घटनेमुळे काही काळ त्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा