महाराष्ट्रात आचारसंहिता जाहीर ५ टप्प्यात होणार मतदान
लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांची घोषणा केली. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे.
शिवाय देशात काही राज्यांमध्ये याच काळामध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. तिथेही निवडणुका होणार आहेत.
१०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. देशातील भौगोलिक परिस्थिती निराळी आहे. तरीही विनासायास निवडणुका पार पाडण्याचा आयोगाचा अनुभव आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलं.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी १.८२ कोटी नवमतदार आहेत
४८ हजार तृतीयपंथी मतदार
१०० वर्षांवरील मतदार २ लाख
४९.७ कोटी पुरुष मतदार
४७.१ कोटी महिला मतदार
१८ ते २१ वयोगटातील २१.५० कोटी मतदार
८२ लाख प्रौढ मतदार
महिला मतदारांची संख्या 12 राज्यात पुरुषांपेक्षा जास्त आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, मसल आणि मनी पॉवर रोखण्यासाठी आयोगाकडून कठोर पावलं उचलली गेली आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत सक्त सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं. मागील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पैसा आणि बळाचा वापर झाल्याचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे सगळ्या हिंसा आणि पैशांचा गैरवापर आम्ही होऊ देणार नाहीत.
'मिथ वर्सेस रियालिटी' अशी वेबसाईट निवडणूक आयोगाच्या वतीने लाँच करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात अफवा रोखण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला आहे. वेबसाईटवर एका बाजूला अफवा आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती दर्शवण्यात येणार आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं.
543 लोकसभा मतदारसंघ
7 टप्यात निवडणुका होणार
पहिला टप्पा- 19 एप्रिल ला मतदान होईल
दुसरा टप्पा - 4 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
26 एप्रिल 2024 ला मतदान होणार
तिसरा टप्पा -19 एप्रिल पासून अर्ज भरता येणार
चौथा टप्पा - 13 मे ला मतदान
पाचवा टप्पा - 20 मे ला मतदान होईल
सहावा टप्पा - 25 मे ला मतदान होणार
सातवा टप्पा - 1 जून ला मतदान होणार
महाराष्ट्रात 5 टप्यात मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे.