आ प्रंशात बंब यांच्या निधीतुन ढोरेगाव येथे सिमेंट रोडचे काम सुरू
औरंगाबाद/प्रतिनिधी
आ प्रंशात बंब यांच्या स्थानिक विकास निधीतुन गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथे सहा लक्ष रुपयांतुन अंतर्गत सिमेंट रोडचे उदघाटन आज करण्यात आले़
शेदुरवादा सर्कल मधील ढोरेगाव येथे आ प्रंशात बंब यांच्या स्थानिक विकास निधी मधुन ढोरेगाव ता.गंगापूर येथे सहा लक्ष रुपये चा गाव अंतर्गत सिमेंट रोडचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य कृष्णा सुकासे यांच्या हस्ते मंगळवार दि २८ डिसेंबर रोजी करण्यात आले,या वेळी बोलताना कृष्णा सुकासे म्हणाले की, या पुर्वी हि या गावात गाव अंतर्गत सिमेंट रोडचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे आज सुरु करण्यात आली आहे, लवकरच आमदारच्या माध्यमातून २० लक्ष रुपयांचे दोन सामाजिक सभागृहाचे कामे मंजूर असुन ते हि कामे तातडीने सुरू करण्यात येणार आहे,यावेळी ढोरेगाव चे सरपंच दिलीप कांबळे, उपसरपंच अलिम पटेल, ग्रामपंचायत सदस्य,सुमनबाई जोशी,सविता कपीले,कासम पटेल, हिरालाल भगुरे, कुसुमबाई बोरुडे,सुरेश सोनवणे, महिला नेहाबाई पठाडे, कयुम पटेल,सोसायटी चे चेअरमन काकासाहेब पठाडे, भारतीय जनता पार्टी युवा मोचार्चे उपाध्यक्ष कुष्णा पठाडे,प्रेमसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती़