जिल्हा परिषदेत आढळले ७५ लेटलतिफ

जिल्हा परिषदेत आढळले ७५ लेटलतिफ

औरंगाबाद/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जि. गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी अधिकाऱ्यांसह सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान बांधकाम, सिंचन, वित्तसह अनेक विभागांना अचानक भेटी दिल्या. यामध्ये ७५ कर्मचारी वेळेवर हजर नसल्याचे समोर आले आहे.
 जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाºयांना वेळ आणि काम याचे बंधन नसल्याचे नेहमी चर्चिले जाते. याचा अनुभव आज पुन्हा एकदा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अचानक भेटीदरम्यान पहायला मिळाला. अध्यक्षांनी आपल्या सहकाºयांसोबत कार्यालयाना भेट दिली असता, कार्यालयाची वेळ ९ वाजून ४५ मिनिटे असताना सकाळी १०.३० पर्यंत कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना कर्मचारी आपल्या टेबलवर आलेले नसल्याने त्यांची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले. याचा प्रत्यक्ष अनुभव पाहणी करण्यासाठी गेलेल्या पदाधिकाºयांना आला.
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने जवळपास सर्वच विभाग वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहे. यामुळे अधिकारी आणि पदाधिकारी यांचे या विभागावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे अनेक विभागातील अधिकारी कर्मचारी आपल्या मर्जीने कार्यालयात येत आणि जात असल्याची चर्चा होत असते.
जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी केलेल्या औरंगाबाद दौºयात अनुपस्थित आढळून आलेल्या कर्मचाºयांचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. या कर्मचाºयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. अनुपस्थित कर्मचाºयाबद्दल अध्यक्षा यांनी चिंता व्यक्त केली असून यापुढे कर्मचाºयांनी वेळ पाळावी असे आदेश देखील अध्यक्षा यांनी दिले आहे.

    विविध विभागातील ७५ लेटलतिफ
बांधकाम विभाग - १७
वित्त विभाग - १७
सिंचन विभाग -७
पंचायत विभाग - ४
पशुसंवर्धन विभाग- १
स्वच्छ भारत मिशन - ९
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा -३
आरोग्य विभाग (एनआरएचएम) -१०  
एकूण अनुपस्थित कर्मचारी - ७५  

जि.प. अध्यक्षा मीना रामराव शेळके यांनी जि.प. आवारातील, नारळीबाग, घाटी परिसरात असलेल्या विभागांना भेटी दिल्या. यावेळी उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोड, बांधकाम अभियंता कल्याण भोसले यांची उपस्थिती होती.

 

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा