मोबाईलचा अतिवापरा टाळा, अन्यथा...
मुंबई : मेंदू विश्वाचे प्रतिनिधित्व करतो. मानवी मेंदूमध्ये १०० अब्ज न्यूरॉन्स असतात तर १० ट्रिलियन कनेक्शन्स (सायनॅप्स) असतात. यामुळेच विश्वातील सर्व कारभाराचे नियंत्रण मेंदू करतो. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात आश्चर्यकारक आणि गुंतागुंतीचा अवयव आहे. मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी रक्तदाब, साखर, वजन, ताण यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अल्कोहोल, तंबाखू, धूम्रपानापासून तर ‘स्क्रीन टाइम’देखील मेंदूच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, असा सूर मेंदूरोग तज्ज्ञांच्या चर्चेतून पुढे आला.
जागतिक आरोग्य संघटना संबंधित ‘वर्ल्ड हेल्थ असेंब्ली’ने ‘इंटरसेक्टोरल ग्लोबल अॅक्शन प्लॅन’ स्वीकारला आहे. मेंदूच्या आरोग्याला चालना देताना आणि मेंदूच्या विकारांना प्रतिबंध करताना मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग या कृती आराखड्याचा आहे. इपिलेप्सी आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर २०२२-२३ (आयजीएपी )नुसार हा ॲक्शन प्लॅन आहे. या ॲक्शन प्लॅनमध्ये प्रत्येक देशातील राष्ट्रीय आरोग्य धोरणांमध्ये मेंदू आरोग्य व्यवस्थापनाचा कार्यक्रम अधोरेखित असून वेळेवर निदान, उपचार आणि काळजीची हमी त्यात असावी, असे स्पष्टपणे नमुद केले आहे.
मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम जाणून घेऊ या..
- झोप उडणे, झोप न येणे
- डोळे दुखणे, पाणी येणे
- डोके दुखणे, चिडचिड करणे
- भूक न लागणे
- मोबाईल न दिसल्यास बेचैन होणे
- स्मरणशक्ती कमजोर होणे
- अभ्यासात मन न लागणे
- एकाग्रता, शिकण्याची क्षमता मंदावणे
- शुक्राणू आजारी होणे, पुढे मुलबाळ न होणे
- मानसिक रोगी होणे
- समाजात न मिसळणे, एकलकोंडा स्वभाव होणे
- कानाजवळ मुंग्या आल्याची भावना होणे
- थकवा, रक्तदाब, अशक्तपणा, हृदयात धडधड वाढणे
- डिप्रेसिव्ह सिंड्रोम निर्माण होऊ शकतो
- मानेचे दुखणे
- सकाळी उठताच मोबाईल पाहिल्यास डोळ्यांना इजा होण्याचा धोका