२५ मार्चला होणारी विद्यापीठाची सत्रांत परीक्षा पुढे ढकलण्यात यावी - अभाविप
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी - MBA-CET चा पेपर २५ मार्च रोजी असल्याने विविध महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले आहेत, परंतु सिईटीच्या पेपर दिवशी विद्यापिठाची सत्रांत परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, यामुळे विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी अभाविपच्या कार्यकर्त्यानी विविध महाविद्यालयाच्या परीक्षार्थींना सोबत घेऊन परीक्षा संचालक गणेश मंझा यांची भेट घेतली, एमबीए सिईटीचा पेपर व विद्यापिठ सत्रांत परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी अडचणी सापडला आहे, त्यामुळे २५ मार्चची होणारी विद्यापीठ सत्रांत परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी अभाविपच्या वतीने परीक्षा संचालक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अभाविप जिल्हा संयोजक उमाकांत पांचाळ, नगरमंत्री चिन्मय महाले, प्रतीक भोसले, प्रेमराज वारे, श्रीराम नाटकर, उमा जोशी सह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.