महापालिकेची मालमत्ता कर वसुली धडक मोहिम
औरंगाबाद /प्रतिनिधी - महानगर पालिकेच्या वतीने शहरातील थकीत रहिवासी व व्यवसायिक मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली बाबत धडक मोहीम राबविली जात आहे. याच अनुषंगाने आज झोन क्रमांक 9 अंतर्गत अतिरिक्त आयुक्त बी.भी .नेमाने यांच्या उपस्थितीत राजा बन्सीलाल मार्केट ,बन्सीलाल नगर येथील मदनलाल अग्रवाल यांच्या कडून थकीत मालमत्ता कर 2,32,122 रु.चा पीडिसी धनादेश घेण्यात आला.तसेच प्रभा अग्रवाल यांच्याकडून 34,257 रु चा धनादेश घेण्यात आला.
रेल्वेस्टेशन येथील हॉटेल तिरुपती यांच्या कडून 89,996 रु .चा पीडिसी धनादेश व स्टेट बँक ऑफ इंडिया दशमेश नगर यांच्या कडून 2,21,234 रु चा थकीत मालमत्ता कर बाबत धनादेश घेण्यात आला.
असे एकूण 4 मालमत्ता धारकाकडून रक्कम रु.5,77,609 ची वसुली करण्यात आली.यावेळी सहायक आयुक्त तथा वार्ड अधिकारी जरारे ,वसुली पथकप्रमुख (क.अ) कानकाटे ,रमेश मोरे,गणेश जाधव ,वसुली कर्मचारी साळवे ,गणेश दाभाडे ,संतोष मगरे,उत्तम पाईकवाडे ,राजू राठोड यांची उपस्थिती होती.