मनपा हद्दीतील शाळा उघडण्याचा निर्णय 15 डिसेंबर नंतर
औरंगाबाद / प्रतिनिधी - औरंगाबाद मनपा हद्दीतील, खाजगी व मनपा चा इयत्ता पहिली ते सातवी वर्ग असलेल्या सर्व माध्यमाच्या शाळा दिनांक 15 डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. परंतु तसा निर्णय अद्दाप झाला नसल्याने शाळा उघडण्याचा निर्णय येत्या 15 डिसेंबर नंतरच घेण्यात येणार असल्याची माहिती मनपातील सूत्रांनी दिली आहे.