पडेगावातील नागरिक का करत आहेत विरोध मनपा अधिकाऱ्यांना
औरंगाबाद / प्रतिनिधी - मनपा प्रशासनाच्या वतीने पडेगाव परिसरातील कचरा डेपो समोर जनावरांच्या स्मशान भूमीचे काम सुरु आहे. कचरा डेपोच्या दुर्गंधी नंतर आता जनांवरांच्या स्मशान भूमीचाही त्रास नागरिकांना होणार आहे. यामुळे नागरिकांनी हे काम बंद पाडले होते. आज बुधवारीही विरोध कायम असल्याने परीसरात भेट दिलेल्या अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त यांनी काढता पाय घेतला.
<span;>पडेगाव परिसरात कचरा डेपोच्या समोर गट क्रमांक १० मध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने जनावरांची स्मशान भूमी उभारली जाणार आहे. गेल्या महिन्यात विकासक संधू चव्हाण यांना या कामाची वर्क ऑर्डर मिळाली. चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांनी कामाला प्रारंभ केला. यानंतर गेल्या आठवडयात शुक्रवारी नागरिकांनी याला विरोध दर्शवित काम बंद पाडले. हे काम शिव रस्त्यात व खासगी जागेत होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यानंतर विकासकांचे कर्मचारी काम सोडून तेथून निघून गेले. दरम्यान बुधवारी येथे अतिरिक्त आयुक्त बी.बी.नेमाने, उपायुक्त सौरभ जोशी यांनी भेट दिली. यावेळी संतप्त नागरिकांनी मनपा प्रशासन फक्त पडेगाव ,भावसिंपुरा च्या लोकांना त्रास देण्यासाठी असे प्रकल्प माथी मारत आहेत का? असा सवाल करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले ,नागरीकांचा विरोध पाहून अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत ,या वर चर्चा करू असे सांगितले.