हिंदू मुस्लिम भाईचाऱ्यासाठी व्यापारी संघटनेचा नवीन उपक्रम
औरंगाबाद/प्रतिनिधी - सगळीकडे मशिदींवरील भोंग्यांवरून वाद सुरू असताना औरंगाबाद येथील चेलिपुरा व्यापारी संघटनेने एक नवीन कृती करून जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
चेलीपूरा व्यापारी संघटनेने चेलिपूरा येथील गणपती मंदिरात हिंदू -मुस्लिम एकत्र गणपतीच्या आरतीचे आयोजन करून जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर मांडले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून भारतात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र राहतात व एक मेकाच्या धर्माचा आदर करतात. अनेक वर्षापासून सर्व धर्माचे व्यापारी चेलीपुरा येथे व्यापार करत आहेत. व्यापाऱ्याचा व्यापार हा एकच धर्म असल्यामुळे येथे सर्व धर्माचे व्यापारी एक जुटीने व्यापार करतात. सर्व समाजात समानतेची भावना सत्यात उतरवण्याचे काम व्यापारी संघटनेने केले आहे. व्यापाऱ्यांमध्ये सर्व धर्म समानतेची भावना होती व ती कायम राहील असे मत व्यापारी संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केले.