महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव या शाळेचा एक अनोखा उपक्रम

औरंगाबाद / प्रतिनिधी  - आदर्श शाळा महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नारेगाव शाळेतर्फे विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला.  प्रमोद झिरपे  आणि शाळेच्या मुख्याध्यापिक संगीता ताजवे  यांच्या मार्गदर्शनाखाली गणिती साहित्य निर्मिती कार्यशाळा आयोजन मनपा नारेगाव शाळेत करण्यात आले होते
     कार्यक्रमाच्या सुरुवातीला  फित कापून  मुख्याध्यापिका संगीता ताजवे आणि प्रमोद झिरपे यांनी  उद्घाटन केले.  कार्यशाळेमध्ये  झिरपे यांनी शाळेतील  इयत्ता वर्गानुसार गणिती साहित्य कसे तयार करावे या विषयातून मुलांना सोप्या भाषेत अध्यापन कसे देता येईल या  बाबत संबंधित शिक्षक वृदांना मार्गदर्शन केले. 
   याप्रसंगी शिक्षिका अनिता पाटील, अश्विनी हिवर्डे, दिपाली गोराडे,  रुपाली पवार,  तिलोत्तमा मापारी,  नीता चव्हाण ,  कीर्ती गायकवाड यांनी तयार केलेले साहित्याची आपण अध्ययन, अध्यापनात वापर कसा करू शकतो याची माहिती सांगितली. शाळेच्या मुख्यधिपिका संगीता ताजवे  व प्रमोद झिरपे  यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांनी तयार केलेल्या साहित्याची कौतुक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अनिता पाटील यांनी केले तर आभार  अश्विनी  हिवर्डे यांनी मानले. या वेळी  अलका गोसावी,ज्योती गुळवे, स्वाती घोडतुरे, अपेक्षा काथार ,राजेश गिरी बोईनवाड ,रविकांत भोसले, किरण तबडे ,शेख नदीम, कैशास टेकले, किशोर बावसकर,फिरोज खान पठाण, अजमल बेग आदी  शिक्षकाची या कार्यशाळेत उपस्थिती होती,या विषय अधिक माहिती एम सी एन न्यूज शी बोलतानी प्रमोद झिरपे यांनी दिली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा