महाराष्ट्र ज्युदो संघटनेची  कार्यकारिनी जाहीर

महाराष्ट्र ज्युदो संघटनेची  कार्यकारिनी जाहीर

औरंगाबाद /प्रतिनिधी - महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत औरंगाबाद जिल्हा ज्यूदो संघटनेचे तांत्रिक समिती अध्यक्ष दत्ता आफळे यांची राज्य तांत्रिक समिती सचिवपदी तसेच जिल्हा सचिव अतुल बामनोदकर यांची व जिल्हा ज्युदो संघटनेचे सहसचिव विश्वास जोशी यांची राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र ज्युदो संघटनेची सातारा येथे रविवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश दिलीप गायकवाड तर भारतीय ज्युदो महासंघातर्फे कोषाध्यक्ष कैलास यादव, व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने संघटनेचे सहसचिव दयानंद कुमार यांनी निरीक्षक म्हणून काम पहिले.

नवनिर्वाचित राज्य कार्यकारिणीत

संघटनेच्या अध्यक्षपदी साताऱ्याचे ॲड धनंजय भोसले, महासाचिवपदी रत्नागिरीचे शैलेश टिळक व राज्य तांत्रिक समिती अध्यक्ष पदी रवी पाटील मुंबई  तर सचिव पदी दत्ता आफळे औरंगाबाद यांची, उपाध्यक्ष पदी मुंबईचे बिलोमोरिया कावस व वाय. एन. बंगेरा, नागपूरचे पुरुषोत्तम चौधरी व अमरावतीचे राजकुमार पूनकर यांची, सहसचिव पदी बीडचे गणेश शेटकर, कोषाध्यक्ष पदी नाशिकचे रवींद्र मेतकर, तर सदस्य पदी सतीश पहाडे अमरावती, अतुल बामनोदकर औरंगाबाद, विकास पाटील सातारा, विश्वास जोशी औरंगाबाद, चंद्रशेखर साखरे सांगली, प्रविण गडदे उस्मानाबाद, निलेश गोयथळे रत्नागिरी, जयंत साखरे यवतमाळ, प्रविण कोपटीकर नांदेड, दिनेश बागुल धुळे, निखिल सुवर्णा ठाणे, वीरधवल पाटोळे कोल्हापूर यांची तर विशेष वरिष्ठ सदस्य पदी रत्नाकर पटवर्धन नाशिक, अर्चना  केवाळे अमरावती, शोभना शेटकर बीड यांची नेमणूक झाली आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा