मनपाची आठ ते दहा कोटीची जागा अतिक्रमण मुक्त
औरंगाबाद / प्रतिनिधी - मनपा हद्दीतील आरेफ कॉलनी खाम नदी लगत महानगरपालिकेच्या खुल्या जागेवरील अतिक्रमण आज निष्कासित करून अंदाजे आठ ते दहा कोटी रुपये किंमतीची जागा ताब्यात घेण्यात आली.
आज अतिक्रमण विभाग महानगरपालिका यांच्या वतीने औरंगाबाद महानगरपालिकेच्या मान्यताप्राप्त लेआउट मधील खुल्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या विरुद्ध आज कारवाई करण्यात आली.
आरेफ कॉलनी परिसरात महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र सभागृह लगत उद्यानासाठी खुल्या जागेवरील काही अज्ञात स्थानिक नागरिकांनी दहा बाय दहा, आठ बाय दहा, सात बाय पाच, पाच बाय पाच या आकाराच्या जागेत तीन पत्र्याचे शेड मारून तात्पुरते स्वरूपाचे अतिक्रमण केले होते. याबाबत माननीय प्रशासक महोदय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांनी पंधरा दिवसापूर्वी स्थळ पाहणी करून अतिक्रमण धारकाबाबत माहिती गोळा करण्याचे अतिक्रमण विभागास निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने या परिसरात येऊन माहिती घेतली असता आवाज बिन चाऊस यांनी त्यांच्या मालकीचा बोर्ड लावला होता व त्याच्यावर गट क्रमांक 34 बटे 2 असे नाव दिले होते. सदर अतिक्रमण हे खाम नदीलगत असल्याची शहनिशा करण्यात आली. आज हे अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले. व मनपा मालकीची जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली. तसेच खुल्या जागी लगत असलेले दोन ओटे आणि दोन जीने काढण्यात आले. ही कारवाई प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत भोये,नगररचना विभागाचे उप अभियंता संजय कोंबडे, उद्यान विभागाचे चांडक ,इमारत निरिक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई गणेश भगत ,पोलीस कर्मचारी गायकवाड ,महिला पोलीस कर्मचारी श्रीमती ठाकरे आदींनी केली . अशी माहिती इमारत निरीक्षक सय्यद जमशेद यांनी दिली आहे.