रेल्वे स्थानकावर सापडली बॉम्ब सदृश वस्तू

रेल्वे स्थानकावर सापडली बॉम्ब सदृश वस्तू

पुणे/ प्रतिनिधी :  पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश वस्तू सापडली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. यामुळे संपुर्ण रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला असून बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

अज्ञात व्यक्तीने ही स्फोटके ठेवली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान पोलिसांनी एक बॉम्ब निकामी केला असून दुसरा निकामी करण्याचे काम सुरु आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सापडल्यानंतर लागलीच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहचला आहे. पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले आहे. तसेच या परिसरात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काही काळासाठी रेल्वे वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे.

पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वेही थांबण्यात आल्या आहेत. पुणे रेल्वे स्थानकाचा परिसर सील करण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यात बॉम्ब सापडल्यामुळे गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब निकामी करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अजून कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी घेतली नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा