देशी दारू दुकानाच्या विरोधात छावा संघटनेचे रास्तारोको आंदोलन

देशी दारू दुकानाच्या विरोधात छावा संघटनेचे रास्तारोको आंदोलन

औरंगाबाद/ प्रतिनिधी - पैठण तालुक्यातील बिडकीन येथे देशी दारू दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करा या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दि.२० में शुक्रवार रोजी पैठण - औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील निलजगाव फाट्यावर निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक रमेश केरे पाटील,छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे, युवक जिल्हाध्यक्ष किरण काळे, राहुल पाटील, विष्णु मोगल,संतोष कुशेकर, आप्पासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

बिडकीन - निलजगाव रोडवरील गट नं.२५१ येथे देशी दारू दुकानाला चालू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.परंतु सदरील परिसर हा मध्य वस्तीत आहे.तसेच या दुकानापासुन १०० मिटरच्या आत जिल्हा परिषद शाळा, मंदिर, स्मशानभूमी असुन दुकानाच्या शेजारी इतर दुकाने आहेत.त्यामुळे या ठिकाणी महिला व मुलींना वावरण्यास त्रास होईल.
परिसरात दारू पिऊन रस्त्यावर भांडण होतील, उघड्यावर लघुशंका करण्याचे प्रमाण वाढेल, महिलांची छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, परिणामतः परिसरातील शांतता भंग होऊन रोजच नविन वाद - विवाद होत राहतील.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.
या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे रस्त्यात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या मुळे अपघाताचे प्रमाण वाढेल. त्यासाठी सदरील दुकान नियोजित ठिकाणी सुरू करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पिनू मुरदारे, अण्णासाहेब जाधव,भारत मोघे इम्रान पठाण,सईद कुरेशी,आसिफ कुरेशी,रेवण लोणकर ,सचिन जोशी,विलास औटी,कैलास पेहरकर,रवी शिंदे यांच्यासह आदी पदाधिकारी व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा