भुसावळ मधील गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल
भुसावळ मधील गोळीबाराचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये चार व्यक्ती हातात बंदूक घेऊन एका चहाच्या दुकानात घुसतात. चहा पीत बसलेल्या तेथील तरुणावर धाडधाड गोळ्या झाडतात आणि काहीही झाले नाही अशा आविर्भावात तिथून बाहेर पडतात. आजूबाजूच्या लोकांनी हे पाहून तिथून पळ काढला. सरकार उडवणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
दुकानामध्ये तेहरीम शेख हा तरुण चहा पित बसला होता. त्याला मारण्यासाठीच हे चार हल्लेखोर आले होते. या तरुणावर बेछूट गोळीबार करून हे हल्लेखोर फरार झाले आहेत. पुर्वीच्या दुष्मनीतून हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. गोळीबार केल्यानंतर हे हल्लेखोर दुकानाबाहेर आले. त्यांनी तिथेही हवेत गोळीबार केला. त्यातून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही सर्व कृत्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. त्यानंतर हे चारही हल्लेखोर चार बाजूला पसार झाले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पोलिस आता तपासून पाहात आहेत. यात दिसत असलेल्या चारही हल्लेखोरांना शोधण्यासाठी आता पोलिसांनी पथकं स्थापन केली आहेत. आरोपींना तातडीने पकडले जाईल असं भूसावळ पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अंतर्गतवादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पण दिवसा झालेल्या या हत्येने भूसावळ शहर हादरले आहे.