डोंगर पोखरणाऱ्या १२ क्रशरविरुद्ध गुन्हा

डोंगर पोखरणाऱ्या १२ क्रशरविरुद्ध गुन्हा

वाळूज महानगर/ प्रतिनिधी - तीसगाव परिसरातील खवड्या डोंगर पोखरून अवैधरीत्या गौण खनिजाची चोरी करणाऱ्या १२ स्टोन क्रशरधारकांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

महसूल विभागाने ६ वर्षांपूर्वी इटीएसद्वारे मोजणी केली होती. महसूल विभागाने स्टोन क्रशरधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेऊन त्यांना नोटिसा बजावल्या होत्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित स्टोन क्रशरधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मंडळ अधिकारी एल. के. • गाडेकर यांच्या फिर्यादीवरून पी. एम. चोरडिया, जसपाल ओबेरॉय, सतीदर ओबेरॉय, सुभाष कणीसे, शिल्पा शर्मा, रवी कसुरे, शेख एजाज, आसाराम तळेकर, सिद्धार्थ दिपके, जसपालसिंग ग्रंथी व मिलिंद थोरात या १२ स्टोन क्रशरधारकांविरुद्ध ४५ कोटी १७ लाख २ हजार २०० रुपयांचा दंड थकविल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा