तिच्या आत्महत्येने घराचा आधारच हरवला
औरंगाबाद /प्रतिनिधी - धुणीभांडी करून आपल्या परिवाराला सांभाळणाऱ्या तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रोकडिया हनुमान कॉलनीत नुकताचसमोर आला आहे.
प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अश्विनी अशोक साठे या 19 वर्षीय तरुणीने तरुणीने आत्महत्या केलीआहे. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अश्विनी ही धुणीभांडी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होती. तिचे काही महिन्यापूर्वी कैलास नगरातील तरुणासोबत प्रेम संबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. पण प्रियकर सतत तिच्या चरित्र्यावर संशय घेऊ लागला त्यामुळे ती तणावात होती. हा प्रकार आठ दिवसापूर्वी कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिची समजूत काढली. मात्र अश्विनी प्रियकरासोबत विवाह करण्यावर ठाम होती. या विवाहास तिने कुटुंबाची मान्यताही मिळवली. पण प्रियकराने विवाह करण्यास नकार दिला त्यामुळे तणावत असणाऱ्या अश्विनीने बुधवारी रात्री आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली
यामुळे घाटी मध्ये गुरुवारी सकाळी मोठा तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी प्रियकरावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. अधिक तपास हवालदार तुकाराम राठोड करीत आहेत.