महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात अभाविप कडून महाराष्ट्र सरकारचा निषेध
औरंगाबाद/ प्रतिनिधी - मुंबई मधील साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ आज अभाविप डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर शाखेच्या वतीने डॉ.बा.आं.म.वि.मुख्य प्रवेशद्वार येथे महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.
महाराष्ट्रामध्ये महिलांची सुरक्षा हा मुद्दा महत्वपूर्ण झालेला असून यासंदर्भात कड़क कायदा निर्माण करण्याची आज गरज आहे, महाराष्ट्रातील वाढत असलेले महिलांवरचे अत्याचार ही अत्यंत चिंताजनक बाब आहे अशा प्रवृत्तीला आळा बसेल व तसे धाडस सुद्धा कोणी करणार नाही कायद्याचा वचक व धाक निर्माण झाला पाहिजे त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने पावले उचलावीत असे अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी आव्हान केले. महानगर सहमंत्री स्नेहा पारिख यांनी सुद्धा यासंदर्भात रोष व्यक्त करून या घटनेचा जाहीर निषेध केला व आरोपींना कठोर शिक्षा देऊन न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा केली.पीड़ित मृत निर्भया ला कॅन्डल मार्च काढून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी ऋषिकेश केकान, श्यामसुंदर सोडगीर नागेश गलांडे शेख सोबिया,सोनल जाधव,प्रवीण शिरसाठ,चेतन बोरसे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.