महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त शहरात स्वच्छता मोहीम  प्लॉग रन मध्ये 3 टन कचरा गोळा

 औरंगाबाद/प्रतिनिधी- औरंगाबाद महानगरपालिकेचा 39 वा वर्धापनदिन शहरात स्वच्छता मोहीम राबवत अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. या दिवशी प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते मनपा मुख्यालय इमारत टप्पा 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त बी भी नेमाने , रवींद्र निकम ,उपायुक्त  सौरभ जोशी,श्रीमती अपर्णा थेटे ,मुख्यलेखाधिकारी संतोष वाहूळे, मुख्यलेखापरिक्षक दे का हिवाळे ,कार्यकारी अभियंता बी डी फड,एस डी काकडे,उद्यान अधीक्षक विजय पाटील,वार्ड अभियंता  काटकर,वार्ड अधिकारी तथा सहायक आयुक्त विक्रम दराडे, संजय सुरडकर,सांस्कृतिक अधिकरी संजीव सोनार,जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 प्लॉग रन 3 टन कचरा गोळा

वर्धापन दिनानिमित्त मा प्रशासक तथा आयुक्त  आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार  उपायुक्त तथा घनकचरा विभाग प्रमुख  सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व 9 झोन अंतर्गत मुख्य रस्त्यावरील (प्लॅस्टिक) कोरडा कचरा गोळा करण्यात आला.9 झोन मिळून एकूण 3 टन 211 किलो कचरा गोळा करून तो पुनरप्रक्रिया साठी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविण्यात आला. यावेळी सर्व वार्ड अधिकारी,स्वछता निरीक्षक, जवान, सफाई मजूर यांनी सहभाग घेतला.

अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

महानगरपालिका मुख्यालय येथे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अधिकारी,कर्मचारी,सफाई कामगार ,मलेरिया मजूर यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.एकूण 255 अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यात 206 पुरुष व 49 स्त्रीयांचा समावेश होता.यात रक्ताच्या सीबीसी ,एचबीए,मधुमेह, एच आय व्ही ,कोविड RTPCR , एवढ्या तपासण्या करण्यात आल्या .तसेच 25 जणांचे ECG काढण्यात आले.
या तपासणीत अतिरिक्त आयुक्त  बी बी नेमाने, मुख्य लेखा परीक्षक  दे का हिवाळे, उपायुक्त श्रीमती अपर्णा थेटे ,वार्ड अधिकारी यांनी सहभाग घेतला.
यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ पारस मंडलेचा ,वैद्यकीय पथक प्रमुख डॉ मनिषा भोंडवे,डॉ अंजली पाथरीकर,डॉ अर्चना राणे,डॉ मेघा जोगदंड ,डॉ बी डी राठोडकर,डॉ उज्वला भांबरे ,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ संजय वऱ्हाडे, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल चे डॉ प्रवीण जाधव आदींनी परिश्रम घेतले .

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा