रोजगार हमी योजनेत घोटाळा 26 लाखाचा गैरव्यवहार
हिंगोली /प्रतिनिधी - हिंगोलीत रोजगार हमी योजनेत घोटाळा, पंचायत समितिच्या तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी अभियंतासह ईतर सात कर्मचाऱ्यांवर 26 लाखाचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत मोठा घोटाळा उघड. रोजगार हमी योजना म्हणजे "आरध्यात आम्ही आरध्यात तुम्ही"हिंगोली च्या औंढा नागनाथ तालुक्यातील रोजगार हमी योजनेत गॅबियन बंधाऱ्यांच्या नावाखाली बनावट मजुर दाखवून त्यांच्या खात्यावर 26 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असुन या प्रकरणाला गोजेगाव ग्रामपंचायतीने वाचा फोडली होती. जिल्हा परीषदेमार्फत रोजगार हमी घोटाळ्याची चौकशी दरम्यान औंढा नागनाथ पंचायत समितीचे तात्कालिन प्रभारी गटविकास अधिकारी जगदीश साहु, सहायक लेख अधिकारी एल के कुरुडे,शाखा अभियंता सयद सलीम अशा एकुण नऊ जणांवर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात 26 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन हिंगोली जिल्ह्यात असे अनेक घोटाळे झाले असल्याचे नागरीकातुन बोलले जात आहे.