राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार

राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार

मुंबई : 18 जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session) पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं होतं. महाराष्ट्रात (Maharashtra) नवं सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पासाळी अधिवेशन 10 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात मंत्री मंडळ विस्तार देखील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ज्यामध्ये नवीन सभापतींची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सभागृहाचे पावसाळी अधिवेशन होणार होते. परंतु जे काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

 पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

मंत्री मंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आत्ता दोन दिवसात होणाऱ्या मंत्रीमंडळात नेमकं मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे देखील लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.

 

 a

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा