नगर परिषद लढवण्यासाठी 13 जुलै मध्यरात्री पर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

नगर परिषद लढवण्यासाठी 13 जुलै मध्यरात्री पर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

परळी /प्रतिनिधी- परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली असून, धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस परतीच्या वतीने मागविण्यात आले आहेत.

सदर अर्ज हे जगमित्र कार्यालयात उपलब्ध असून, हे अर्ज संपूर्ण माहिती भरून दोन प्रतींमध्ये दि. 13 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत जगमित्र कार्यालयात सादर करण्यात यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित वॉर्ड मधील आरक्षण, महिला व पुरुष आरक्षण, यांसह अन्य जमेच्या बाजू याबाबत सखोल माहिती दर्शविणारा अर्ज नमुना इच्छूक उमेदवारांसाठी आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला असून, हा अर्ज केवळ परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इच्छूक असलेल्या व्यक्तींसाठी असून इच्छुक उमेदवारांनी सदर अर्ज निर्धारित वेळेत सादर करणे बंधनकारक असणार आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा