नुकसान झालेल्या लोकांचे पुर्नवसन करावे
औरंगाबाद/ प्रतिनिधी - महानगरपालिका प्रशासनाने किलेआर्क परिसरात विकास आराखड्यात बांधीत मालमत्ता पाडल्या. ज्यांच्या मालमत्ता पाडल्या त्या नागरिकांना त्वरित पर्यायी जागा व घरे द्यावी अशी मागणी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली आहे. या विषयी जैस्वाल यांनी मनपा आतरिक्त आयुक्त यांची भेट घेउन लवकरात लवकर पुर्नवसन करावे अशी मागणी केली.