वाकण ग्रामपंचायत तर्फे किसान कार्ड वाटप

वाकण ग्रामपंचायत तर्फे किसान कार्ड वाटप

पोलादपूर / प्रतिनिधी - पोलादपूर तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या वाकण ग्रामपंचायत अंतर्गत महापंचायत राज अभियान शुक्रवारी राबविण्यात आले. यावेळी 20 ग्रामस्थांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत पंचायत समिती पोलादपूर व ग्रुप ग्रामपंचायत वाकण याच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
  या वेळी  उपसरपंच पाडुरंग शिंदे ग्रामसेविका त्रिशिला गंभीरे,  माजी पोलीस पाटील किसन साने, लक्ष्मण  साने, नाणेघोळ पोलीस पाटील सुरेश जंगम व वाकण ग्रामपंचायत मधिल ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
   या कार्यक्रमात 20 ग्रामस्थांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यात आले तर 3 ई श्रमदान कार्ड ,36 जॉब कार्ड ची नोंदणी करण्यात आली. या वेळी नागरिकांना प्रत्येक योजनेची माहिती देण्यात आली त्याच प्रमाणे वाकण तलाठी सजेचे तलाठी बनसोडे  यांनी वारस नोंदी बाबत माहिती दिली. ग्रामस्थांनी वारस नोंदणी करणे असे सांगत  मुलगा असो किंवा मुलगी याची वारस नोंद होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी  ग्रामस्थांनी वारस नोंद करून घेतली.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा