नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा 17 पैकी 11 जागेवर शिवसेना विजयी
सोयगाव / प्रतिनिधी - दि.19, सोयगाव मध्ये महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाचा विजय झाला असून या निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत 17 पैकी 11 जागेवर विजय मिळवीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले.
विजयाची घोषणा होताच सोयगाव येथील शिवसेना पक्ष कार्यालय सेना भवन येथे फटाक्यांची आतषबाजी , जय भवानी जय शिवाजींच्या जयघोषात जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड पंचायत समितीचे सभापती डॉ. संजय जामकर, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जि. प.सदस्य गोपीचंद जाधव, शहरप्रमुख संतोष बोडखे, सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धर्मसिंग चव्हाण, उस्मान पठाण, तालुका उपप्रमुख गुलाबराव कोलते, दारासिंग चव्हाण, सिल्लोड चे शिवसेना नगरसेवक विठ्ठल सपकाळ, राजू गौर, नॅशनल सुत गिरणीचे संचालक विशाल जाधव, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील पाटील , शहरप्रमुख अमोल मापारी, शीवाप्पा चोपडे आदीं शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
हा विजय विश्वासाचा , मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार*
सोयगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळविले हा विजय विश्वासाचा, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाचा असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथे विजयोत्सव साजरा करताना व्यक्त केले.
सोयगाव ला लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजना मिळवून देणार असून सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सोयगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विकास साधून सोयगावला विकासाच्या माध्यमातून नवे रूप देणार असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगर पंचायत ची एकमेव निवडणूक होती. भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोयगाव येथील निवडणुकीत जोरदार प्रयत्न करून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदार बांधवांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिले. शिवसेनेच्या सहा उमेदवारांचा केवळ 2 - 3 मतांच्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत भाजपला जोरदार चपराक बसली.
भाजपला जोरदार धक्का
वॉर्ड क्र. 1 मध्ये भाजपचे माजी ( विद्यमान ) नगराध्यक्ष कैलास काळे यांच्या पत्नी कल्पना काळे यांचा दारुण पराभव झाला या वॉर्डात शिवसेनेच्या शाहिस्ताबी रउफ यांनी जोरदार मुसंडी मारली. तसेच वॉर्ड क्र. 4 मध्ये कैलास काळे यांचे पुतणे संदीप काळे यांचा शिवसेना उमेदवार हर्षल काळे यांच्याकडून दारुण पराभव झाला.
शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे यांच्या पत्नी सुरेखा काळे तसेच शहरप्रमुख संतोष बोडखे यांचा दणदणीत विजय
सोयगाव येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाते ही उघडता आले नाही.