पर्यावरण संवर्धन काळाची गरज- नानासाहेब हरकळ
वाळुज/ प्रतिनिधी - पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शहिद भगतसिंह विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब हरकळ यांनी दि.6 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केले.
यावेळी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय काळे, नेहरू युवा केंद्राच्या साहाय्यक स्नेहा शिरसाठ, सांस्कृतिक विभाग प्रमुख शाम टापरे, कार्तिक पवार , ज्योती झाल्टे आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुञसंचलन उत्कर्ष आहेर तर आभार अतुल मोरे यांनी केले .यावेळी स्लो सायकल स्पर्धेत अनुक्रमे प्रथम मयुर बच्छिरे, द्वितीय कृष्णा महाङिक,तृतीय कोमल हजारे यांनी पदक पटकविले .या प्रसंगी शाळेतील 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्रीकांत पवार, राहुल कांयदे, चंद्रकांत म्हस्के, सोनाली सोनटक्के, संगिता साळवे, वाघमोङे मँङम, अमित ङफळ, हिवाळे सर , आव्हाङ सर , दिगबंर नवगिरे आदीनी परीश्रम घेतले.