का केला मुलांनेच बापाचा खून

का केला मुलांनेच बापाचा खून

सांगली /प्रतिनिधी - उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मुलाने खून केल्याची घटना सांगली  जिल्ह्यात आज (बुधवार) घडली आहे.
ही घटना सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेडग या गावात आज (बुधवार) घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतील संशयित आरोपी हा घटनेनंतर फरार झाला आहे. पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
घटनास्थळावरुन आणि पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार लक्ष्मण आकळे याने वडिलांकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. ते आज वडील दादू आकळे हे मागण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी लक्ष्मण याने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला.
ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पाेहचले. पाेलीसांनी अधिक चाैकशी केली असता त्यांना मुलगा लक्ष्मण आकळे याने हा प्रकार केल्याची काही लाेकांनी सांगितले. त्यानंतर ताे घटनास्थळावरून पळून गेला. मिरज ग्रामीण पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा