तोल गेल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद/ प्रतिनिधी- घरातील पाण्याची टाकी साफ करताना तोल गेल्याने 37 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सातारा परिसरातील ज्ञानेश्वर नगर भागात शनिवारी दुपारी घडली या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यादव सोपान गायकवाड (वय 37 वर्ष रा. सातारा परिसर )असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरातील पाण्याचा हौद स्वच्छ करीत होते, दरम्यान त्यांचा तोल गेल्याने ते हौदात पडले आणि पाण्यात बुडून ते बेशुद्ध पडले, ही बाब समजताच नातेवाईकांनी त्यांना घाटी रुग्णालयात हलवले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.