दोन वाहनांचा भीषण अपघात 37प्रवासी जखमी 15गंभीर

दोन वाहनांचा भीषण अपघात 37प्रवासी जखमी 15गंभीर

खेड /प्रतिनिधी - मुंबई- गोवा महामार्गावर दोन अपघात झाले असून या अपघातात एकूण 37 प्रवासी जखमी झाल्याची माहिती नुकताच समोर आली आहे.
त्यापैकी 15 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पहिला अपघात लक्झरी बसला भरणे गोवळवाडी येथे झाला आहे. तर दुसरा अपघात तवेरा गाडीचा झाला आहे. परळ हून खेड तालुक्यातीलकेळणे या गावात लग्नासाठी जात असताना खासगी आराम बसला अपघात झाला आहे.

भरणे गोवळवाडी या ठिकाणी महामार्गाच्या कडेला बस खड्ड्यात जाऊन पलटली तर मुंबईहून जयगडला जाणाऱ्या तवेरा गाडीचा देखील भरणे वळंज वाडी या ठिकाणी अशाच प्रकारे महामार्गलगत खड्ड्यात पडून अपघात झाला आहे. दोन्ही अपघातामध्ये 37 प्रवासी जखमी, त्यामध्ये पंधराहून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात पहाटे सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

तसेच खेडमधील मदत ग्रुप आणि रेस्क्यू टीमचे जवान ही घटना स्थळी मदतीला दाखल झाले. दोन्ही अपघातांमधील सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा