महापालिका आयुक्त व नागरिकात झटापट पहा व्हिडिओ
औरंगाबाद/ प्रतिनिधी : औरंगाबाद महापालिकेत पाणी मिळत नाही म्हणून निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांवर आयुक्तांनी हात उचलला आणि प्रकरण अंगलट येईल म्हणून माझ्यावर हल्ला झाल्याचा कांगावा महापालिका आयुक्त तसा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी आज केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त दालनासमोर घडली.
नळाला कमी दाबाने आणि आठ-दहा दिवसानंतर पाणी येते त्यामुळे पाणीपट्टी कमी करा किंवा पाणी जास्तीचे वाढवून द्या अशी मागणी करण्याचे निवेदन घेऊन आलेल्या नागरिक व कार्यकर्त्यांना आयुक्तांनी धक्काबुक्की करून कानशिलात वाजवली. ही घटना महापालिका परिसरात दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मात्र कार्यकर्त्यांवर हात उचलणे आपल्याला महागात पडू शकते हे आयुक्त यांच्या लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केल्याचा बनाव त्यांनी केला. अशी चर्चा प्रत्यक्षदर्शी मध्ये होती. तर आयुक्तांनी आमच्यावर हात उचलला अशी माहिती कार्यकते यांनी दिली.
पाणी प्रश्न गंभीर : आयुक्तांच्या अडचणीत वाढ
औरंगाबाद शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गेल्या दोन महिन्यापासून शहरातील वातावरण पाण्यामुळे गढूळ झाल्याचे दिसून येते गेल्या दोन महिन्यात भाजपाने अनेक आंदोलने केली. यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पाण्यासाठी आयुक्तांना धारेवर धरले आहे मात्र या पाणीचोरी रोखता आली ना पाण्यात वाढ करता येईल या गोष्टीमुळे मनपा आयुक्त यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
आयुक्त हे शिवसेनेच्या जवळचे असल्याचा भास अनेकांना झाल्यामुळे विविध पक्षाचे नेते आणि पदाधिकारी आयुक्तांवर पाण्यासाठी तुटून पडत आहे. तर दुसर्या बाजूला शिवसेना वरहात करत असल्याने आयुक्त आता पाणी प्रश्नावरून अडचणीत असल्याची चर्चा होत आहे.