राष्ट्रीय जंतनाशक  व मोफत लसीकरण मोहिमेचे उदघाटन

राष्ट्रीय जंतनाशक  व मोफत लसीकरण मोहिमेचे उदघाटन

औरंगाबाद/प्रतिनिधी - राष्ट्रीय जंतनाशक मोहिम व  मोफत लसीकरणाचे उदघाटन औरंगाबाद तालुक्यातील वडखा येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे जानकेदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सि. पी. त्रिपाठी, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.  
जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या मार्फत जिल्ह्यासाठी २ लाख ३० हजार कोविड लस देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत कोविड19 मोफत लसीकरनाचे  उदघाटन  वडखा येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी  करण्यातआले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल काकडे, पंचायत समिती सभापती घागरे, तहसीलदार ज्योती पवार, कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती राधाकृष्ण पठाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा