गंगापूर पोलिसांची कारवाई बारा जुगारी अटकेत
औरंगाबाद/प्रतिनिधी - गंगापूर तालुक्यातील सारंगपूर शिवारामध्ये बाभळीच्या झाडाखाली पत्त्याचा जुगार खेळणारे बारा आरोपी गंगापूर पोलीसांनी पकडले असून त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्य व आकरा मोटरसायकल असा एकूण चार लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संजय लोहकरे याना त्याच्या गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरुन १५ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता सारंगपूर शिवारामध्ये पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या टीमने धाड टाकली असता बाभळीच्या झाडाखाली पत्त्याचा जुगार खेळणारे बारा आरोपी पकडले असून त्यांच्याकडून रोख १५ हजार १०० रुपये,८ मोबाईल किमत ३००० रुपये, ११ मोटरसायकली किमती ४ लाख ४० हजार रुपये असा एकूण ४ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक संजय बन्सोड ,उपविभगीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गगापुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, एएसआय गणेश काथार, पोलिस अमलदार बलविर बहुरे,गायकवाड,चव्हाण यांनी केली असून पुढील तपास पोना अमित पाटील हे करीत आहे