शिवजयंती निमित्त वैचारिक शिवजागर
औरंगाबाद / प्रतिनिधी - शिवजयंती निमित्त एकीकडे ढोल आणि भगव्या झेंड्याचा उत्साह आणि दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे क्रांतीचौकाच शांतपणे काॅ गोविंद पानसरे लीखीत शिवाजी कोण होता? यासह अनेक पुस्तिका सवलतीच्या दरात विक्री करुन शिवचरित्र घरोघरी नेण्याची मोहीम केली जाणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे " मी नेणार शिवचरित्र माझ्या घरी " मोहीम राबविण्यात येणार असून क्रांतीचौकातील छञपति शिवाजी महाराजांच्या नुतन पुतळ्याचे अनावरणाच्या सोहळ्यानिमित्त फक्त 20/- रुपयात शिवाजी महाराजांना रयतेची आई संबोधणार्या शहीद काॅ गोविंद पानसरे लीखीत शिवाजी कोण होता ? उपलब्ध करण्यात आले आहे. हे पुस्तक सवलतीच्या देण्यासाठी ऑल इंडीया स्टुडंट्स फेडरेशन च्या कोल्हापूर शाखेची विषेश मदत झाली. या पुस्तकाच्या स्टाॅलवर इतरही पुस्तक अत्यंत स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध राहतील. उद्या दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजेपासून राञी 12 पर्यंत पुस्तकविक्री करुन शिवचरित्र घरोघरी पोहोचवण्याची मोहीम केली जाणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या बुकस्टॉल ला भेट देऊन पुस्तक विकत घ्यावी, वाढदिवसाला भेट द्यावीत, लग्न समारंभात आहेर देण्या ऐवजी शिवाजी कोण होता ? हे पुस्तक देऊन शिवआहेर करावा असेही आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षा तर्फे करण्यात येत आहे. या मोहीमेत ॲड. अभय टाकसाळ, विकास गायकवाड, राजु हिवराळे, अनिता हिवराळे, मनिषा भोळे, संग्राम कोरडे, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, माधुरी जमधडे, ज्योतिका गायकवाड, भालचंद्र चौधरी इ चे विषेश सहभाग आहे .