शहरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग
संभाजीनगर /प्रतिनिधी - संभाजीनगर शहरातील
जिन्सी पोलीस ठाणे हद्दीतील आझाद चौका लगत असलेल्या लाकडी फर्निचरच्या दुकानास आज सकाळी 5.15 ते 5.30 वाजेच्या दरम्यान अचानक अचानक आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे कळते.
फर्निचरच्या दुकानाला लागलेली आग ही गुड मॉर्निंग स्क्वाडच्या पोलीस अमलदारांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षास व अग्निशमन दलाला कळविले. त्यामुळे तात्काळ पोलीस बंदोबस्त व फायर ब्रिगेडच्या गाड्या हजर झाल्या. त्यामुळे तात्काळ आग आटोक्यात आणण्यास मदत झाली.
या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही झाली परंतु दुकानातील लाकडी फर्निचरचे सर्व सामान जवळून खाक झाले. या दुकानाच्या बाजूला ८ ते १० लाकडी फर्निचर चे छोटे-मोठे दुकान होते लाकडी सामान असल्यामुळे त्यातील जवळच्या दुकानांनी देखील लगेच पेट घेतला. त्यातील बरेच लाकडी फर्निचरचे सामान जळून खाक झाले. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती परंतु वेळीच लक्षात आल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवता आले व ही दुर्घटना टळली. आग लागलेली कळताच परिसरातील लोकांनी गर्दी केली परंतु पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता लोकांना दूर राहण्यास सांगितले. यावेळी घटनास्थळी पोलीस अधिकारी तांबे व अंमलदार,आरसीपी अंमलदार व वाहतूक शाखेचे अंमलदार हजर होते.
आग लागण्याचे नेमके कारण
आग लागलेल्या फर्निचरच्या दोन्ही बाजूस इलेक्ट्रिक
ट्रांसफार्मर असून इलेक्ट्रिक वायर या दुकानावरून गेलेल्या आहेत. सध्या तापमान जास्त असल्याने काही लोकांनी इलेक्ट्रिक ट्रांसफार्मर जवळ आग लागल्याचे सांगितले होते. ती आग विझविण्यात आली होती परंतु त्यानंतर दुसऱ्या ट्रांसफार्मर ला आग लागली व त्यामुळे फर्निचरच्या दुकानास देखील आग लागली. या घटनेबाबत अकस्मात आग दाखल करून पुढील तपास करण्यात येत आहे.