कारसमोर जनावर आडवे आल्याने कारवरील नियंत्रण सुटले

कारसमोर जनावर आडवे आल्याने कारवरील नियंत्रण सुटले

चंद्रपूर / प्रतिनिधी -     चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथे कारसमोर जनावर आडवे आल्याने वाहन अनियंत्रित होऊन पुलावरुन कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार  झाले तर सहा जण जखमी झाल्याची घटना  नुकताच घडली.
चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथेहा अपघात घडला. किरण पारखी (32) आणि शोभा पारखी (60) अशी मयत महिलांची नावे आहेत. अन्य 6 जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हे सर्व जण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. रामनगर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

तेरवीचा कार्यक्रम करुन परतत होते पारखी कुटुंब
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील पारखी कुटुंब मोठ्या भावाच्या तेरवीच्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथे गेले होते. तेरवीचा कार्यक्रम आटोपून सर्व जण गडचिरोली येथे परतत होते. चंद्रपूर शहराजवळच्या चिचपल्ली येथे पारखी यांच्या भरधाव कारसमोर जनावर आडवे आले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित झाल्याने पुलावरुन खाली कोसळली. यात पोलिस कर्मचारी अनिल पारखी यांच्या आई आणि पत्नीचा मृत्यू झाला. तर अनिल पारखींसह 6 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा