मा. खा. कीरीट सोमय्या यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

मा. खा. कीरीट सोमय्या यांच्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

औरंगाबाद /प्रतिनिधी-  जालना येथे दि. 1 डिसेंबर रोजी मा. खा. किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील पोलीस हे भ्रष्ट आहेत तर मुंबई पोलीस माफिया आहेत हे उदगार काढले. त्या वक्तव्याचा  पोलीस बॉईज असोसिएशन ने जाहीर निषेध केला असून मा. खा. किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एका मोठ्या पक्षाचे खासदार राहिलेले किरीट सोमय्या यांनी पोलिसांची जाहीर माफी मागावी. 26  नोव्हेंबर ला जो मुंबईत आतंकी हल्ला झाला तेंव्हा जीवाची पर्वा न करता पोलिसांनी आतंकवाद्याला जिवंत पकडले. कुख्यात गुन्हेगारांना यमसदनी पाठवले. कोरोना काळातदेखील पोलीस आपला जीव धोक्यात घालून कर्तव्यावर होते.मुंबई पोलीस जगात नंबर दोन ला आहे. देशाचे पंतप्रधान देखील पोलिसांचा आदर करतात. किरीट सोमय्या यांचे वक्तव्य पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला पाहिजे अन्यथा किरीट सोमय्या यांना पोलीस बॉईज  महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक रवी नानाभाऊ वैद्य यांनी नमूद  केले आहे.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा