स्वस्तिक प्लाझा इमारतीतील हॉटेलला आग
नवी मुंबई / प्रतिनिधी - स्वस्तिक प्लाझा या इमारतीत तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलला भीषण आग लागली. गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागली व शॉक सर्किट झाल्यानंतर ही आग पसरली.कामोठे येथील सेक्टर 12 परिसरात ही इमारत आहे. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे.
नवी मुंबईतील कामोठे परिसरातील एका हॉटेलला रात्रीच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. गॅसचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.