औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघात

औरंगाबाद-जालना मार्गावर भीषण अपघात

औरंगाबाद /प्रतिनिधी - औरंगाबाद -जालना मार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.  अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ बस व बोलेरो पिकअप ची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच  करमाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. या अपघातात पाच जण ठार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु. निश्चित आकडा अजून समोर आलेला नाही.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा