प्रामाणिक फेरीवाल्यांचा शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक तर्फे सत्कार

प्रामाणिक फेरीवाल्यांचा  शहीद भगतसिंग हाॅकर्स युनियन संलग्न आयटक तर्फे सत्कार

औरंगाबाद / प्रतिनिधी - 18000 रु व महत्वाची कागदपञे असणारे पाकीट सापडल्या नंतर प्रामाणिकपणे ते परत करणाऱ्या दिपक वानखेडे व गणेश रोजेकर या  पथविक्रेत्याचा शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न आयटक च्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याबाबतअसे की ,  दि . 8/1/022 शनिवार  रोजी सायंकाळी 5:30 वा.गुलमंडीतील एस मार्ट समोर शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे सदस्य दिपक वानखेडे यांना त्यांच्या हातगाडी समोर एक पर्स/ पॅकेट सापडले.  ज्यामध्ये रूपये 18000/- कॅश , आधार कार्ड, ए टी एम  ओळख पत्र होते. याची माहिती त्यांनी युनियन चे कार्यकर्ते गणेश रोजेकर यांना कळवली. थोड्या वेळाने ते दोघे  पोलिसात जाऊन  हे पॉकेट जमा करणार होते.  परंतु  प्रत्येकाला पाकीट सापडले का ? असे  विचारत विचारत दोन महिला आल्या. चौकशी अंती लक्षात आले की संबंधित महिला श्रीमती अनिता त्रिभुवन आहे आणि हरवलेलं पॉकेट त्यांचंच होत. त्या पाकिटातील ओळखपत्र पाहुन हे सिद्ध झाल्याने ते त्यांना सुखरूप परत करण्यात आले . श्रीमती त्रिभुवन या औरंगाबाद क्राईम ब्रांच मधे अधिकारी आहेत असेही त्यांनी सांगीतले.  त्यांची पर्स/ पॅकेट जसे च्या तसे परत करण्यात आले. यावेळी त्या  महिला अधिकाऱ्यांनी पथविक्रेते दीपक वानखेडे आणि गणेश रोजेकर यांचे मनापासून आभार मानले व त्यांना कीती पैसे देऊ विचारले असता दोघांनीही पैसे घेण्यास नकार दिला म्हणून व त्यांना उत्तम मिठाई मधून  1- 1 किलो मिठाई भेट म्हणून स्वखुशीने त्यांच्या मुलांसाठी भेट दिली.  युनियनच्या वाॅटस ग्रुप वरुन ही बातमी युनियनचे अध्यक्ष अॅड अभय टाकसाळ यांना कळताच त्यांनी दीपक वानखेडे आणि गणेश रोजेकर यांच्या प्रामाणिक पणाचे कौतुक करून शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने युनियन च्या खोकडपुरा कार्यालयात त्यांचा सत्कार केला .  ज्यांना प्रामाणिकपणे कष्ट करायची इच्छा नसते ते चोर्या  करतात,  चोर्या करायच्या नाही - कष्ट करुन खायच आणि सरकार नोकर्‍या देऊ शकत नाही म्हणून फुटपाथवर स्वस्तात वस्तु विकतो तरीही व्यवस्थेकडुन गुन्हेगारा सारखी वागणुक दिली जाते. प्रामाणिकपणा हा पथविक्रेत्यांच्या नैसर्गिक गुण आहे या शब्दात अॅड अभय टाकसाळ यांनी  दोघांचे कौतुक केले.  यावेळेस युनियन चे अध्यक्ष कॉ.अभय टाकसाळ,भालचंद्र चौधरी,विजय रोजेकर,इसाक शेख,कृष्णराम डाँगा,किशोर हरिश्चंद्रे आदी युनियन चे सभासद सत्काराच्या वेळी उपस्थित होते.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा