बसचा भिषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू आठ जण गंभीर

बसचा भिषण अपघात सहा जणांचा जागीच मृत्यू आठ जण गंभीर

बीड /प्रतिनिधी - बस आणि ट्रकचा बीडमध्ये आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास भिषण अपघात झाला. लातूर-अंबाजोगाई रोड वर हा अपघात झाला असून यात सहा जणांचा जागीच मृत्यू  तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आंबेजोगाई हुन लातूर कडे जाणारा ट्रक व लातूर औरंगाबाद लातूर या एस टी बसमध्ये बरदापुर फट्यानाजिक एका वळणावरती जोरात धडक झाली. अपघाताचे नेमके कारण अजून कळालेले नसून दाट धुक्यामुळे अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 
हा अपघात इतका भिषण होता की यात ट्रक व बसच्या काही भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

आमच्या बातम्या WhatsApp वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा