नशेच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त बेगमपुरा सिटीचौक पोलिसांची संयुक्त कारवाई.
औरंगाबाद/प्रतिनिधी - आसेफिया कॉलनी येथून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा मोठा साठा मंगळवारी रात्री बेगमपुरा व सिटीचौक पोलिसांनी संयुक्तिकरित्या कारवाई करत जप्त केला.शेख नय्यर शेख नईम, शेख नईम शेख महेबूब, शकिराबाई शेख नईम, शेख नदीम शेख नईम, (सर्व रा. असेंफिया कॉलोनी,औरंगाबाद), समीना खान अब्दुल अमीन खान (रा.रेल्वे स्थानक परिसर, सदातनगर,)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की,ऑक्टोबर 2021 मध्ये एन.डी.पी.एस ऍक्टनुसार आरोपी नदीम शेख विरोधात सिटीचौक पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झालेला होता.तेंव्हा पासून तो फरार होता. मंगळवारी संध्याकाळी नदीम घरी आला असल्याची माहिती सिटीचौक ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांना मिळाली होती. त्या माहितीवरून एक पथक असेंफिया कॉलोनी भागात रवाना करण्यात आला. पथक नदीमच्या घरी पोहोचल त्यांनी घराची झडती घेतली आता नदीम मिळून आला नाही.मात्र झडतीमध्ये नदीमच्या घरात गुंगी आणणाऱ्या नायट्रोजन-१० या कंपनीच्या तब्बल ४४६ औषधी गोळ्यांचा साठा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी नदीम चा भाऊ नय्यर यास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अजून गोळ्यांचा साठा रेल्वेस्थानक परिसरातील सदातनागर येथे राहणाऱ्या बहिणीच्या घरात लपून ठेवल्याची माहिती दिली.नय्यरच्या माहितीवरून बेगमपुरा व सिटीचौक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सादतनगर गाठत तेथे छापा टाकला व नय्यरची बहीण समिनाच्या घरातून अल्परासेफ नावाच्या १५० औषधी गोळ्यांचा साठा जप्त केला. या प्रकरणी पाच जना विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात एन.डी. पि.एस.ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई परिमंडळ १ च्या उपयुक्त उज्वला वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक अशोक भांडारी, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, साह्ययक निरीक्षक सय्यद, उपनिरीक्षक विनोद भालेराव आदींच्या पथकाने केली.