आई-वडिलांचे प्रेम आंधळ तीन मुलींना सोडलं वाऱ्यावर
संभाजीनगर /प्रतिनिधी - असं म्हणतात की प्रेम आंधळ असत, मात्र ते इतक आंधळ असत की आपल्या पोटच्या लेकरांना प्रेमासाठी सोडून देणारे निर्दयी आई-वडील छत्रपती संभाजीनगर आहेत.
एक सात वर्षीय, नऊ वर्षीय आणि अकरा वर्षीय अशा तीन मुलींना घरात सोडून वडील प्रेयसीसोबत, तर आई प्रियकरासोबत पसार झाले आहेत. आईने दुसरे लग्न केले, बापही घरातून निघून गेला. धक्कादायक म्हणजे या घटनेला तीन महिले उलटले असून, दोघांपैकी एकही जण घरी न परतल्याने मुलं उघड्यावर आली आहेत. सुरवातीला तीन महिने शेजाऱ्यांकडून या मुलींचे पालनपोषण करण्यात आले, मात्र आई-वडील काही परतलेच नसल्याने प्रकरण आता थेट पोलिसांत पोहचले आहे.
राखी व संतोष (नावे बदललेली) हे जोडपे काही महिन्यांपासून किरायाने राहत होते. त्यांना तीन मुली आहेत. असे असतानाच दोघांचे बाहेर वैयक्तिक विवाहबाह्य संबंध सुरू झाले. दोघेही प्रेमात एवढे आंधळे झाले की, त्यांनी मुलींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नव्हता. अनेकदा मुलींना ते मारहाण देखील करायचे. घरात सतत चिडचिडेपणा पाहायला मिळायचा. पुढे काही दिवसांनी दोघेही घर सोडून निघून गेले. आई प्रियकरासोबत निघून गेल्याने, वडील देखील आपल्या प्रेयसीसोबत राहण्यासाठी कुठेतरी निघून गेले. आई-वडील घरी येत नसल्याने मुलांना त्यांची चिंता लागली. पण तीन महिने झाले अजूनही आई-वडिलांनी आपल्या मुलींकडे एकदाही येऊन त्यांची विचारपूस केली नाही. तर, मागील अडीच महिन्यांपासून आई- वडिलांच्या प्रतीक्षेत मुलींच्या डोळ्यातील अश्रू क्षणभरही थांबले नाहीत.
पोलिसांची भूमिका....
तीन महिन्यापूर्वी घरातून वडील निघून गेले. त्यानंतर आईने दुसऱ्यासोबत लग्न करून राहु लागली. गेल्या तीन महिन्यांपासून दोघेही घरी आले नाही. या तिन्ही चिमुकल्यांनी घरात होते नव्हते त्यावर आपली पोटाची भूक भागविली. जेव्हा याची माहिती शेजाऱ्यांना मिळाली तेव्हा ते देखील मुलांच्या मदतीला धावून आले. शेजाऱ्यांनी या मुलांना दोन वेळेचे जेवण दिले. मात्र, हे किती दिवस चालणार म्हणून शेजाऱ्यानी पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितला.
गेल्या तीन महिन्यांपासून तीन मुली घरात एकटयाच राहात असल्याचे माहिती दिली. यावर सातारा पोलिसांनी खात्री करून हे प्रकरण बाल कल्याण समितीसमोर ठेवले. बाल कल्याण समितीने तातडीने निर्णय घेत तिन्ही मुलींना छावणीतील विद्यादिप बालगृहात पाठविले. या प्रकरणी आई वडिलांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.