२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड
औरंगाबाद / प्रतिनिधी - शहरातील भवानीनगर
परिसरातील ढोके कुटुंब गावाकडे गेले असता
दोन दिवस घर बंद असल्याचा फायदा घेत
चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील वस्तूसह
रोख रक्कम असे एकुण ५० हजार ८६० रुपये
चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस
आली.
याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल होताच अवघ्या २४ तासांच्या आतच
पोलीसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. सय्यद
हानेफ (वय.२३, रा.शरीफ कॉलनी)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदरील कारवाई जिन्सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांच्या
मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोकुळ ठाकुर
यांच्यासह संपत राठोड, हकीम शेख, नंदू
परदेशी, सुनील जाधव, ज्ञानेश्वर बावस्कर
आणि संतोष बमनात यांनी यशस्वी पार पाडली.