चेलीपुरा काचीवाडा भागात दूषित पाण्याने नागरिक त्रस्त
औरंगाबाद / प्रतिनिधी - चेलीपुरा काचीवाडा भागात गेल्या अनेक वर्षांपासून नळाला दूषित दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने येथील नागरिकांच्चा आरोग्य धोक्यात आलं,या समस्येकडे मनपा दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या विरोधात आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
चेलीपुरा काचीवडा भागातील कंलिका माता मंदिर गल्लीत गेल्या वर्षापासून नळाला पिण्याचे पाणी ड्रेनेज मिश्रित दुर्गंधीयुक्त येत आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आसून कावीळ,डेंग्यू मलेरिया इतर साथरोगासह पोटाचेआजार पसरत आहे. एक तर मनपा आठवड्यातून एक वेळेस पाणी सप्लाय करते आणि ते पण 1 तास यात अर्ध्या तासाच्या वर नळाला दूषित काळे पाणी येते ,पाण्याला घाण वास असतो या मुळे पाण्याची साठवण सुध्दा करता येत नाही अशी व्यथा त्रस्त नागरिकांनी मांडल्या.
तरी मनपा प्रशासन या कडे लक्ष देत नाही ,या दूषित पाण्या विषय स्थानिक नागरिकांनी सतत पाणी पुरवठा विभागा कडे तकार निवेदन अर्ज दिले,पण निगरगट्ट प्रशासन या कडे लक्ष देत नाही.
येत्या काही दिवसात या प्रश्नाकडे महानगरपालिकेने लक्ष दिले नाही तर संतप्त नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.