ट्रकची क्रूझरला धडक भीषण अपघात
धुळे / प्रतिनिधी :- धुळ्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचे अचानक समोरील टायर फुटले व ट्रक अनियंत्रित झाला. त्याने थेट समोरील क्रुझरला धडक दिली. धडक इतकी भीषण होती. ट्रक थेट तापी नदीपात्रात कोसळला. सोमवारी (२३ जानेवारी) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये २० ते २५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिवारात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं आहे.
अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ट्रकमधील चालक वाहकांना शोधण्याचं काम सुरू आहे. ट्रकमध्ये किती जण होते. याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.