सखाराम पानझाडे यांना पुन्हा मुदतवाढ
औरंगाबाद/ प्रतिनिधी- सेवा निवृत्त शहर अभियंता सखाराम पानझाडे यांना परत 6 महिन्याच्या मुदत वाढीला शासनाची मान्यता मिळाली आहे.
महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शहर अभियंता सखाराम पानझडे यांना पुन्हा 6 महिन्याची मुदतवाढ देण्याच्या मनपा प्रशासणाच्या ठरावास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. तसे आदेशपत्र आज मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहे.
महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून नोकर भरती झाली नाही. यात अनेक अधिकारी व कर्मचारी सेवा निवृत्त होत आहेत. यामुळे प्रशासनाकडे मोठया प्रमाणात मनुष्यबळ ची कमतरता भासत आहे. ही उणीव भरण्यासाठी मनपाने खाजगी ठेकेदारांमार्फत कर्मचारी नियुक्त केले आहेत.
पण मनपा प्रशासना कडे कुशल व अनुभवी अधिकाऱ्याची गरज आहे कारण या अनुभवी अधिकाऱ्यां मार्फत शहरातील विविध महत्वकांक्षी प्रकल्प व विकास हाती घेतले आहे. हे कामे पूर्ण करण्यासाठी आशा अधिकाऱ्यांची गरज असल्याने मनपा करार पद्धतीने याची नियुक्ती करत आहे.
मनपाकडे शहर अभियंता पदासाठी अशाच अधिकाऱ्यांची उणीव असल्याने सेवा निवृत्तीनंतर ही माजी शहर अभियंता याना परत करार पद्धतीने मनपा सेवेत घेण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने घेतला होता. या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आसून या संदर्भात आदेशाचे पत्र आले आहे.
<span;>सेवा निवृत्त शहर अभियंता सखाराम पानझडे हे 30 जून 2021मनपा सेवा निवृत्त झाले होते यांना मनपाने 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2021रोजी प्रेयत मुदतवाढ दिली होती ,या नंतर आता 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 पर्यंत अशी 6 महिन्याची करार पद्धतीने मुदतवाढ दिली आहे.