मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद/ प्रतिनिधी - मनसेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारीआंदोलन करण्यात आले होते या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलीप (बापु) धोत्रे, सुहास दाशरथे (जिल्हा अध्यक्ष ), सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, संघपाल रत्नाकर जाधव या सहा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी अतिवृष्टी प्रकरणी विविध मागण्या संदर्भात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मनसेने मोर्चा काढला होता.या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.तरी देखील मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी जमावबंदी व कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनस्थळावरून मंडप आणि साउंड सिस्टीम जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.